प्रकरण ४ प्राथमिक आर्थिक क्रिया : भौगोलिक कारणे लिहा

 भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी  गुण)

maharashtra state board geography bhugol important questions and answers marathi medium 

प्रकरण ४ प्राथमिक आर्थिक क्रिया

 

(२५) भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) मोसमी हवामान (२) पर्जन्याचे निश्चित स्वरूप व कालावधी (३) नदयांची खोरी (४) जास्त लोकसंख्या (५) मूलभूत गरजा भागवण्यासाठी शेती हाच प्रमुख व्यवसाय (६) उदरनिर्वाहक शेती (७) शेतीचे सार्वत्रिक स्वरूप,

उत्तर : भारत हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश असून, येथे प्रामुख्याने मोसमी हवामान आढळते. भारतात मोसमी हवामानामुळे निश्चित पर्जन्याची उपलब्धता, सम हवामान आणि अनेक नद्यांची खोरी यांमुळे शेतजमिनींची उपलब्धता आहे. लोकसंख्या खूप जास्त असून, अन्न आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी शेती हाच प्रमुख पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हा शेती व्यवसाय प्रामुख्याने सखोल उदरनिर्वाहक स्वरूपाचा शेती व्यवसाय आहे. येथील प्रमुख पीक तांदूळ असून बहुतांश उत्पादन हे स्थानिक बाजारपेठेत उदरनिर्वाहासाठी वापरले जाते. पारंपरिक शेती पद्धती, जमिनीचे क्षेत्र कमी मजुरांची भरपूर उपलब्धता त्यामुळे मानवी श्रमाचा शेतीमध्ये वापर जास्त, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाचा वापर खूपच कमी प्रमाणात ही येथील शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत.

 

 (२६) भारतातील छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) भारतीय पठारी प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग (२) खनिजसंपत्तीने समृद्ध क्षेत्र.

उत्तर : भारतातील छोटा नागपूर पठारात झारखंड, ओदिशा, बिहार व आसपासचा प्रदेश यांचा समावेश होतो. या भागात लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत. त्यामुळे छोटा नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे..

 

(२७) कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.(मार्च २२; जुलै २२)

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) समशीतोष्ण सूचिपर्णी वृक्षांची वने (२) वृक्षांची कमी घनता, एकाच जातीचे वृक्ष, मऊ लाकूड (३) वाहतूकदृष्ट्या सुगम (४) इतर प्राथमिक व्यवसायांचे पर्याय कमी.

उत्तर : कॅनडामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. सूचिपर्णी वनांच्या क्षेत्रात मऊ लाकडाचे वृक्ष असतात. त्यामुळे लाकूडतोड करणे सोपे जाते. या वनात एकाच जातीचे वृक्ष एकत्रित वाढतात. त्यामुळे वृक्ष तोडणे व त्यांचे वर्गीकरण करणे अतिशय सुलभ होते. सूचिपर्णी वने ही मोकळ्या स्वरूपाची वने असल्यामुळे तेथे लाकूडतोड करणे सोयीचे असते. सूचिपर्णी वने वाहतूकदृष्ट्या सुगम असतात. या वनात मऊ लाकडाचे वृक्ष असल्याने त्यांचे लाकूड हलके असते. ज्यामुळे त्यांची वाहतूक करणे सोपे जाते. शिवाय या प्रदेशात इतर प्राथमिक व्यवसायांची उपलब्धता कमी आहे. हिवाळे तीव्र असल्यामुळे शेती किंवा पशुपालन असे व्यवसाय करण्यास येथे मर्यादा पडतात. याशिवाय हिवाळ्यात गोठलेल्या नदयांच्या पात्रांवर म्हणजेच हिमनद्यांवर लाकूडतोड करून लाकडाचे ओंडके रचले जातात. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागले की नदयांच्या प्रवाहाबरोबर हे ओंडके वाहत जाऊन लाकूड कापण्याच्या कारखान्यांपर्यंत सहज पोहोचतात. अशा प्रकारे कॅनडामध्ये लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे.