योग्य क्रम लावा : Maharashtra State Board HSC 12th Bhugol Important Questions and Answers Marathi Medium
योग्य क्रम लावा :
प्रकरण १ लोकसंख्या : भाग १
(१) सर्वाधिक ते कमी लोकसंख्या असणारी भूमिखंडे.
(अ) आफ्रिका
(ब) आशिया
(क) ऑस्ट्रेलिया
(ड) दक्षिण अमेरिका
(२) कमी ते जास्त लोकसंख्या घनता असणारे देश.
(अ) बांग्लादेश
(ब) ब्राझील
(क) रशिया
(ड) भारत
(३) लोकसंख्या संक्रमणाच्या १ ते ५ टप्प्यांप्रमाणे लोकसंख्या वैशिष्ट्यांचा क्रम.
(अ) लोकसंख्येत कमी बदल
(ब) लोकसंख्येत शून्य वाढ
(क) आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या
(ड) नंतरच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या
उत्तरे :
(१) आशिया आफ्रिका दक्षिण अमेरिका - ऑस्ट्रेलिया - -
(२) रशिया - ब्राझील भारत - बांग्लादेश
(३) आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या नंतरच्या काळात विस्तारणारी - लोकसंख्या - लोकसंख्येत कमी बदल लोकसंख्येत शून्य वाढ.
प्रकरण २ : लोकसंख्या : भाग २
(१) वयोरचनेनुसार लोकसंख्या क्रम लावा. (मार्च २२)
(अ) युवक
(ब) प्रौढ
(क) कुमार
(ड) बालक
(२) व्यवसायांचा प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक असा क्रम लावा.
(अ) बांधकाम
(ब) खाणकाम
(क) वाहतूक
(ड) शेतमजूर
(३) विकसित देशांत कार्यशील लोकसंख्येची व्यवसायनिहाय टक्केवारी उतरत्या क्रमाने लावा.
(अ) सेवाक्षेत्र
(ब) प्राथमिक व्यवसाय
(क) उदयोगधंदे
(४) साक्षरतेच्या प्रमाणानुसार खंडांची क्रमवारी ( उतरत्या क्रमाने). (सप्टें. २१)
(अ) आशिया
(ब) युरोप
(क) आफ्रिका
(ड) उत्तर अमेरिका
उत्तरे :
(१) बालक कुमार युवक प्रौढ. - -
(२) शेतमजूर खाणकाम बांधकाम वाहतूक. -
(३) सेवाक्षेत्र - उदयोगधंदे प्राथमिक व्यवसाय. 1
(४) युरोप - उत्तर अमेरिका - आशिया आफ्रिका. -
प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
(१) वाढत्या लोकसंख्येनुसार पुढील वस्त्यांचा क्रम लावा.
(अ) शहर
(ब) उपनगर
(क) खेडे
(ड) महानगर
(२) वाढत्या लोकसंख्येनुसार मानवी वस्त्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा.
(अ) खेडे
(ब) महानगर
(क) पाडा
(ड) शहर
(३) लोकसंख्या घनतेनुसार वस्त्यांची क्रमवारी (उतरत्या क्रमाने). (सप्टें. २१)
(अ) विखुरलेली वस्ती
(ब) एकाकी वस्ती
(क) केंद्रित वस्ती
(ड) विखंडित वस्ती
(४) वसाहतीच्या आकारानुसार लहानाकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा. (मार्च २२)
(अ) नगर
(ब) महानगर
(क) उपनगर
(ड) महाकाय नगर
उत्तरे :
(१) खेडे - उपनगर - शहर - महानगर.
(२) पाडा खेडे - शहर - महानगर.
(३) केंद्रित वस्ती विखंडित वस्ती - विखुरलेली वस्ती एकाकी वस्ती. - -
(४) उपनगर नगर महानगर - महाकाय नगर.
प्रकरण ४ प्राथमिक आर्थिक क्रिया
(१) शेती क्षेत्राच्या आकारावरून कमी क्षेत्र ते मोठे क्षेत्र असे शेती प्रकाराचे क्रम लावा.
(अ) मळ्याची शेती
(ब) विस्तृत शेती
(क) मंडई - बागायती शेती
(२) खनिजांच्या वापराच्या विविध युगांचा क्रम लावा.
(अ) ताम्रयुग
(ब) अणुयुग
(क) लोहयुग
(ड) कांस्ययुग
(३) पुढील व्यवसायांचा प्राथमिक ते तृतीयक व्यवसाय असा क्रम लावा.
(अ) शिकार
(ब) कारखाना
(क) पशुपालन
(ड) घाऊक व्यापार
(४) पुढील वनक्षेत्रांचा / वन प्रकारांचा विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत क्रम लावा. (सप्टें. २१)
(अ) उष्णकटिबंधीय पानझडी वने
(ब) विषुववृत्तीय सदाहरित वने
(क) समशीतोष्ण कटिबंधीय सूचिपर्णी वने
(ड) समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने
उत्तरे :
(१) मंडई - बागायती शेती - मळ्याची शेती - विस्तृत शेती.
(२) कांस्ययुग - ताम्रयुग - लोहयुग - अणुयुग.
(३) शिकार पशुपालन - कारखाना- घाऊक व्यापार. -
(४) विषुववृत्तीय सदाहरित वने - उष्णकटिबंधीय पानझडी वने समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने समशीतोष्ण कटिबंधीय सूचिपर्णी वने.
प्रकरण ५ : द्वितीयक आर्थिक क्रिया
(१) भांडवल आधारित उद्योग चढत्या क्रमाने लावा.
(अ) दुग्धप्रक्रिया
(ब) दूरदर्शन संच निर्मिती
(क) वस्त्रोद्योग
(ड) विणकर
(२) भांडवल आधारित उद्योग उतरत्या क्रमाने लावा.
(अ) कागद निर्मिती
(ब) ऊर्जा निर्मिती
(क) सायकल निर्मिती
(ड) स्थानिक दुग्धप्रक्रिया
(३) कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा. (मार्च २२)
(अ) मध्यम
(ब) सूक्ष्म
(क) लघू
(ड) मोठे
उत्तरे :
(१) विणकर - दुग्धप्रक्रिया दूरदर्शन संच निर्मिती - वस्त्रोद्योग. -
(२) ऊर्जा निर्मिती - सायकल निर्मिती • कागद निर्मिती स्थानिक दुग्धप्रक्रिया.
(३) सूक्ष्म लघू मध्यम मोठे. -
प्रकरण ६ तृतीयक आर्थिक क्रिया
(१) संदेशवहन साधने ( कालमापीप्रमाणे).
(अ) टेलिग्राम
(ब) उपग्रहीय दूरध्वनी
(क) दूरदर्शन
(ड) सांडणीस्वार
(२) व्यवसाय क्रम ( उतरत्या क्रमाने ).
(अ) ग्राहक सेवा
(ब) कच्चा माल उत्पादन
(क) संशोधन
(ड) पक्का माल उत्पादन
(३) स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे पुढील देशांचा क्रम लावा (चढत्या क्रमाने). (सप्टें. २१)
(अ) भारत
(ब) अमेरिकेची संयुक्त संस्थाने
(क) केनिया
(ड) डेन्मार्क
उत्तरे :
(१) सांडणीस्वार - टेलिग्राम दूरदर्शन उपग्रहीय दूरध्वनी. -
(२) संशोधन ग्राहक सेवा - पक्का माल उत्पादन - कच्चा माल उत्पादन.
(३) केनिया - भारत डेन्मार्क - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
प्रकरण ७ प्रदेश व प्रादेशिक विकास
(१) क्षेत्रफळानुसार प्रदेश ( चढत्या क्रमाने). (मार्च २२)
(अ) तालुका
(ब) राज्य
(क) देश
(ड) जिल्हा
(२) प्रभावाखालील क्षेत्रफळानुसार प्रदेश (उतरत्या क्रमाने).
(अ) मोबाइल टॉवर क्षेत्र
(ब) वायफाय क्षेत्र
(क) दूरदर्शन प्रसारण क्षेत्र
(ड) उपग्रह संदेशवहन क्षेत्र
(३) विकासस्तरानुसार महाराष्ट्रातील पुढील प्रदेशांची क्रमवारी (चढत्या क्रमाने). (सप्टें. '२१)
(अ) विदर्भ
(ब) पश्चिम महाराष्ट्र
(क) खानदेश ( उत्तर महाराष्ट्र)
(ड) मराठवाडा
(४) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GDP) वाढीसाठी भूमी उपयोजनांचे अनुकूल घटकांकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा. (मार्च २२)
(अ) पडीक भूमी
(ब) चराऊ भूमी
(क) लागवडीखालील भूमी
(ड) वनाखालील भूमी
उत्तरे :
(१) तालुका - जिल्हा राज्य - देश. -
(२) उपग्रह संदेशवहन क्षेत्र दूरदर्शन प्रसारण क्षेत्र मोबाइल टॉवर क्षेत्र - - वायफाय क्षेत्र.
(३) मराठवाडा - विदर्भ - खानदेश (उत्तर महाराष्ट्र) पश्चिम महाराष्ट्र.
(४) लागवडीखालील भूमी वनाखालील भूमी चराऊ भूमी पडीक भूमी. -
प्रकरण ८ : भूगोल : स्वरूप व व्याप्ती
(१) चढत्या श्रेणीनुसार भूगोल अभ्यासकाची कौशल्ये.
(अ) विदा विश्लेषण
(ब) अहवाल लेखन
(क) विदा संकलन
(ड) निरीक्षण
उत्तरे :
निरीक्षण
विदा संकलन विदा विश्लेषण अहवाल लेखन.