रिकाम्या जागी कंसांतील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा : Geography Bhugol (भूगोल) Class 12
Maharashtra State Board Class 12 Geography (भूगोल)
प्रकरण १ लोकसंख्या : भाग १
(१) शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे ______
घटक आहेत.
(आर्थिक, सामाजिक, प्राकृतिक, राजकीय)
(२) वाळवंटी प्रदेशात लोकसंख्येची घनता ______ आढळते.
(खूप जास्त, जास्त, मध्यम, कमी)
(३) जगातील ______ या खंडात लोकसंख्येची घनता सर्वांत कमी आहे.
(उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया)
(४) चीन खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर ______
या देशाची लोकसंख्या आहे.
(बांग्लादेश, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत)
(५) लोकसंख्येची घनता
______ खंडात सर्वांत जास्त आहे.
( उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप)
उत्तरे :
(१) शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे आर्थिक घटक आहेत.
(२) वाळवंटी प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते.
(३) जगातील ऑस्ट्रेलिया या खंडात लोकसंख्येची घनता सर्वांत कमी आहे.
(४) चीन खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर भारत या देशाची लोकसंख्या आहे.
(५) लोकसंख्येची घनता आशिया खंडात सर्वांत जास्त आहे.
प्रकरण २ : लोकसंख्या : भाग २
(१) भारतातून अमेरिकेला नोकरीकरिता जाणाऱ्या लोकांचे स्थलांतर______ प्रकारचे आहे.
(आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक)
(२) ______
घटक व्यक्तीला स्थलांतर करण्यास भाग पाडतो.
(पर्यावरणीय, सांस्कृतिक, आकर्षण, अपकर्षक)
(३) निर्वासितांचा लोंढा हे स्थलांतरामागील ______
कारण दर्शवते.
(आर्थिक, प्राकृतिक, राजकीय, आकर्षण)
(४) ______
साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
(दक्षिण आफ्रिकी देशात, युरोपमध्ये, दक्षिण आशियात, उत्तर आफ्रिकेत)
(५) ______
वयोगटातील लोकसंख्येला कार्यशील लोकसंख्येचा गट म्हणतात.
(0 ते १०, १५ ते ५९, २५ ते ७५, ७५च्या वरील)
उत्तरे :
(१) आर्थिक
(२) अपकर्षक
(३) राजकीय
(४) युरोपमध्ये
(५) १५ ते ५९.
प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
(१) ______
हा बहुतांश ग्रामीण वस्त्यांमधील मुख्य व्यवसाय आहे.
(शेती, खाणकाम, व्यापार, कारखानदारी)
(२)______
हे शैक्षणिक शहर आहे.
(शेंद्री, पणजी, पुणे, शिर्डी)
(३) कर्नाटकातील ______
हे व्यापारी केंद्र आहे.
(मंगळुरू, बंगळुरू, पारादीप, विजयवाडा)
(४) उत्तर भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ______
आहे.
(मेरठ, अमृतसर, चंडीगढ, कानपूर)
(५) ______
हे भारतातील एक प्रमुख औदयोगिक शहर म्हणून म्हटले जाते.
(हैदराबाद, जयपूर, जमशेदपूर, जोधपूर )
उत्तरे :
(१) शेती
(२) पुणे
(३) मंगळुरू
(४) अमृतसर
( ५ ) जमशेदपूर.
प्रकरण ४ : प्राथमिक आर्थिक क्रिया
(१) ______
आर्थिक क्रिया नैसर्गिक पर्यावरणाशी निगडित आहेत.
(प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक)
(२) ईशान्य अटलांटिक महासागरात ______
बँक जगात मासेमारी व्यवसायात महत्त्वाची ठरली जाते.
(ग्रेट, जॉर्जेस, ग्रँड, डॉगर)
(३) जगातील सर्वाधिक लोकसंख्या ______ व्यवसायात कार्यरत आहे.
(प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक)
(४) ______
ही जमात आजही शिकार करून आपला चरितार्थ चालवते.
(किर्गिझ, मिझो, एस्किमो, रेड इंडियन)
उत्तरे :
(१) प्राथमिक
(२) डॉगर
(३) प्राथमिक
(४) एस्किमो.
प्रकरण ५ : द्वितीयक आर्थिक क्रिया
(१) ______
हा जपानमधील औदयोगिक प्रदेश आहे.
(न्यू इंग्लंड, उरल, नागोया, किंबलें)
(२) साखर उदयोगात ______
हे इंधन म्हणून वापरले जाते.
(कोळसा, मळी, पेट्रोल, डिझेल)
(३) कापूस हा ______
स्वरूपाचा कच्चा माल आहे.
(शुद्ध, अशुद्ध, जड, नाशवंत )
(४) लोह-पोलाद उद्योगधंदे ______
स्थापन होतात.
(पाणीपुरवठा प्रदेशांजवळ, कोळसा उत्पादक प्रदेशांजवळ, बाजारपेठांजवळ, बंदरांजवळ)
उत्तरे :
(१) नागोया
(२) कोळसा
(३) शुद्ध
(४) कोळसा उत्पादक प्रदेशांजवळ.
प्रकरण ६ : तृतीयक आर्थिक क्रिया
(१) विकसित देशात सर्वाधिक लोक ______
व्यवसायांत गुंतलेले असतात.
(प्राथमिक, चतुर्थक, तृतीयक, द्वितीयक)
(२) व्यापार वाहतूक हे ______
व्यवसाय आहेत.
(प्राथमिक, चतुर्थक, तृतीयक, द्वितीयक )
(३) चतुर्थक व्यवसाय हे प्रामुख्याने ______
आधारित असतात.
(गुंतवणुकीवर, निसर्गावर, ज्ञानावर, शेतीवर)
(४) पर्यटन हा ______
व्यवसाय आहे.
(प्राथमिक, चतुर्थक, तृतीयक, द्वितीयक)
(५) ______
व्यवसायात कोणतेही उत्पादन घेतले जात नाही.
(शेती संशोधन, बेकरी, लोह, पोलाद)
उत्तरे
: (१) तृतीयक
(२) तृतीयक
(३) ज्ञानावर
(४) तृतीयक
(५) शेती संशोधन.
प्रकरण ७ प्रदेश व प्रादेशिक विकास
(१) ______
हा प्राकृतिक घटकांच्या आधारे निश्चित केलेला प्रदेश आहे.
(महाराष्ट्र, तमिळनाडू, कोकण, कर्नाटक)
(२) ______
हा मानवी घटकांच्या आधारे निश्चित केलेला प्रदेश आहे.
(तमिळनाडू, गंगा नदीचे खोरे, अँडीज पर्वतीय प्रदेश, दक्षिण कोरियाचे द्वीपकल्प)
(३) नागपूर महानगर क्षेत्र हा ______
प्रदेश आहे.
( औपचारिक, भाषिक, पर्वतीय, कार्यात्मक)
(४) प्रदेशाच्या आर्थिक विकासात ______
हा केंद्रबिंदू असतो.
(प्रदेश, मानव, निसर्ग, वाहतूक)
उत्तरे :
(१) कोकण
(२) तमिळनाडू
(३) कार्यात्मक
(४) मानव.
प्रकरण
८ भूगोल स्वरूप व व्याप्ती
(१) प्राकृतिक भूगोल ______
घटकांवर आधारित आहे.
(मानवी, नैसर्गिक, प्रादेशिक, सांस्कृतिक)
(२) भूपृष्ठ जलावरण, वातावरण यांचा समावेश ______
भूगोलात केला जातो.
(मानवी, प्रादेशिक, प्राकृतिक, आर्थिक)
(३) हवामानशास्त्र व ______ यांचा निकटचा संबंध आहे.
(सागरशास्त्र, खगोलशास्त्र, वातावरण, भूगर्भशास्त्र)
(४) सागरशास्त्रात ______ हा अभ्यासविषय आहे.
(घनता, मृदा, क्षारता, सुपीकता)
(५) मानव आणि ______ यांच्या सहसंबंधांचा अभ्यास भूगोलशास्त्रात केला जातो.
(लोकसंख्या, राज्यव्यवस्था, ऐतिहासिक घटक, पर्यावरणीय घटक)
(६) निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे ही विचारसरणी ______ या नावाने ओळखली जाते.
(निसर्गवाद, संभाव्यवाद, शक्यतावाद, अद्वैतवाद)
(७) कृषी भूगोल हा मानवी भूगोलाच्या या शाखेची उपशाखा आहे. (सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल)
(८) मानवी भूगोलाची ______
ही शाखा आहे.
( हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, लोकसंख्या भूगोल, प्राकृतिक भूगोल )
उत्तरे :
(१) नैसर्गिक
(२) प्राकृतिक
(३) वातावरण
(४) क्षारता
(५) पर्यावरणीय घटक
(६) निसर्गवाद
(७) आर्थिक भूगोल
(८) लोकसंख्या भूगोल