चूक की बरोबर ते लिहा / योग्य की अयोग्य ते लिहा :
चूक की बरोबर ते लिहा / योग्य की अयोग्य ते लिहा :
प्रकरण १ लोकसंख्या : भाग १ :
(१) ऑस्ट्रेलिया खंडात लोकसंख्या सर्वांत कमी आहे.
(२) आशिया खंडाची खंडांतर्गत भूमीची टक्केवारी सर्वांत कमी आहे.
(३) अंटार्क्टिका खंडावर लोकसंख्येची घनता दाट आहे.
(४) विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते.
(५) तिबेटच्या पठारावर लोकसंख्या घनता अधिक आहे.
(६) ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आढळते.
(७) जन्मदर व मृत्युदर दोन्ही अधिक असेल तर लोकसंख्या वाढ होते. (जुलै २२)
उत्तरे :
(१) बरोबर
( २) चूक
(३) चूक
(४) बरोबर
(५) चूक
(६) चूक
(७) चूक.
प्रकरण २ : लोकसंख्या : भाग २
(१) स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत...
(२) नागरी भागाकडे लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते.
(३) प्रदेशाची स्वयंपूर्तता स्थलांतरामुळे संपुष्टात येते.
(४) लोकसंख्येतील साक्षरता प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे दयोतक असते.
(५) लोकसंख्येच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून ग्रामीण व शहरी असे दोन वर्ग करता येतात..
(६) मानव हा समाजशील प्राणी असल्याने, तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो.
(७) स्थलांतर हे नेहमी कायमस्वरूपी असतेच असे नाही. (जुलै २२)
उत्तरे :
(१) बरोबर
(२) बरोबर
(३) बरोबर
(४) बरोबर
(५) बरोबर
(६) बरोबर
(७) बरोबर.
प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
(१) एका केंद्राभोवती केंद्रीय वस्तीचा विकास होतो.
(२) दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी चौकोनी वस्त्या आढळतात.
(३) ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात.
(४) गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते.
उत्तरे :
(१) बरोबर
(२) चूक
(३) बरोबर
(४) बरोबर.
प्रकरण ४ प्राथमिक आर्थिक क्रिया
(१) भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. (जुलै २२ )
(२) कॅनडामधे लाकूडतोडीचा व्यवसाय अविकसित राहिला आहे.
(३) विस्तृत शेती हा उदरनिर्वाहक शेतीचा प्रकार आहे.
(४) बहुतांश देशांत शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
(५) भारतातील शेती हा पशुपालनास पूरक व्यवसाय आहे.
(६) दक्षिण आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटातील बुशमेन आदिवासी जमाती त्यांच्या चरितार्थासाठी शिकार करतात.
(७) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड अतिशय मऊ असते.
(८) सूचिपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले असतात.
(९) जपान आणि चीन यांसारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे.
(१०) शेतीखालील प्रदेश आणि पशुपालन यांचे वितरण बऱ्याच प्रदेशात एकत्रित आढळून येत नाही.
(११) मानवाने समुद्र व अन्य महासागरांच्या तळातूनसुद्धा तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
(१२) शेती या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे.
उत्तरे :
(१) बरोबर
( २) चूक
(३) चूक
(४) बरोबर
(५) चूक
(६) बरोबर
(७) चूक
(८) बरोबर
(९) बरोबर
(१०) चूक
(११) बरोबर
(१२) चूक.
प्रकरण ५ : द्वितीयक आर्थिक क्रिया
(१) उद्योगांचे वर्गीकरण हे आकार, कच्च्या मालाचे स्रोत, उत्पादनाचे स्वरूप आणि मालकी या आधारे केले जाते.
(२) अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उद्योगांचा विकास कमी झाला आहे.
(३) अन्नप्रक्रिया उद्योग हा कृषीवर आधारित उद्योग आहे.
(४) १० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उद्योगांना मोठे उद्योग म्हणतात.
(५) ONGC हा बहुराष्ट्रीय उद्योग आहे.
(६) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळ प्रक्रिया उद्योग आढळतात. (जुलै २२)
उत्तरे :
(१) बरोबर
( २) चूक
(३) बरोबर
(४) बरोबर
(५) बरोबर
(६) बरोबर..
प्रकरण ६ तृतीयक आर्थिक क्रिया
(१) तृतीयक आर्थिक व्यवसायांत प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून जसेच्या तसे उत्पादन घेतले जाते.
(२) व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय...
(३) आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावर अवलंबून असते.
(४) पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे..
(५) भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर व व्यापारावर परिणाम होतो.
उत्तरे :
(१) चूक
(२) बरोबर
(३) बरोबर
(४) बरोबर
(५) बरोबर.
प्रकरण ७ प्रदेश आणि प्रादेशिक विकास
(१) समान गुणधर्मांच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते.
(२) निरक्षरता, दारिद्र्य यांसारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
उत्तरे :
(१) बरोबर
( २) बरोबर.
प्रकरण ८ : भूगोल स्वरूप व व्याप्ती
(१) मानवी भूगोलाच्या विविध शाखा-उपशाखा आहेत..
(२) भूगोल या विषयाचे स्वरूप स्थिर, अचल आहे. (जुलै २२)
(३) भूगोल या विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
उत्तरे :
(१) बरोबर
(२) चूक
(३) बरोबर.